Main Article Content

Abstract

संशोधकाने पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय रायफल शुटींग खेळाडूंच्या कार्यमानावर निवडक प्राणायामाचा होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय रायफल शुटींग खेळाडूंच्या कार्यमानावर निवडक प्राणायामाचा होणारा परिणाम अभ्यासणे. प्रशिक्षण पूर्व कार्यमान व निवडक प्राणायाम प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्या नंतरचे कार्यमान पाहणे व त्याचा परिणाम अभ्यासणे. परिकल्पना अशी होती की, संशोधनात वापरलेल्या निवडक प्राणायामाचा राष्ट्रीय रायफल शुटींग खेळाडूंच्या कार्यमानावर सार्थक परिणाम आढळून येईल. सदर संशोधनाची परिसीमा १० मीटर एयर रायफल पुरुष या क्रीडा प्रकाराचा समावेश केलेला आहे. सदर संशोधनाकरिता संशोधकाने पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीयस्तरावरील शुटींग स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या एकूण २० रायफल शुटींग खेळाडूंची सहेतुक पद्धतीने निवड केलेली  आहे. त्यांचे वय १८-२५ वर्ष होते. प्रस्तृत संशोधनात प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केला आहे. पिक फ्लो चाचणी, दहा मीटर शुटींग चाचणी ही माहिती संकलनाची साधने वापरण्यात आली असून सांख्यिकीय विश्लेषणासाठी मध्यमान, प्रमाण विचलन, टी परिक्षीका, मध्यमानातील फरक, स्वाधीनता मात्रा, यांचा वापर करण्यात आला आहे. प्राणायामाच्या प्रशिक्षणाचा राष्ट्रीय रायफल शुटींग खेळाडूंच्या फुफ्फुसधारण क्षमतेच्या कार्यमानावर सार्थक फरक आढळून आला. हे स्पष्ट झाले.

Article Details