Main Article Content

Abstract

सध्याचे युग हे अत्यंत धावपळीचे युग आहे. सर्वजन कोणत्या ना कोणत्या गोष्टींच्या मागे धावत आहेत आणि त्यात त्यांनी आपल्या पाल्यांना सहभागी करून घेतल्याचे चित्र आपल्या आजूबाजूला दिसत आहे.सकाळी उठल्यापासून शाळा,विविध विषयातील शिकवणी, गृह्पाठ, पर्यायाने परिक्षाची टक्केवारी यामागे विद्यार्थी धावत असतो. या सर्व पळापळीमध्ये किशोरवयीन मुलांचे कुठेतरी नुकसान होत आहे, असे जाणवते. शारीरिक शिक्षण व क्रींडा हे मुलांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे आणि आपला पाल्य माध्यमिक स्तरावर शिकायला लागला की सर्वप्रथम याच माध्यमास अटकाव करण्यात येतो आणि त्यासाठी कारण दिले जाते खेळल्याने अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. याचसर्व पार्श्वभूमीचा विचार करता संशोधक विद्यार्थ्यांने या संदर्भात अभ्यास करण्याचे निश्चित केले आहे.

Article Details