Main Article Content

Abstract

समाज म्हटलं की, समाजात विविध घटक आणि विविध स्तरावरील लोक आले. पण आजच्या आपल्या समाजाची मानसिकता बिघडलेली आहे. आपल्यातील काही व्यक्तींना समाज कुत्सित नजरेने पाहतो आणि ते म्हणजे तृतीयपंथी! तृतीयपंथी कसेही असले तरी या समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. बालपणापासूनच ह्या व्यक्ती त्यांच्या आई-वडिलांपासून दूरावल्या जातात. त्यामुळे त्यांना आई-वडिलांची साथ मिळत नाही आणि आई-वडील साथ देत नाही म्हणून समाज पण साथ देत नाही. आपल्या समाजाने तृतीयपंथी व्यक्तीचा एक वेगळाच समाज निर्माण केला आहे. त्यामुळे ह्या तृतीयपंथी समाजापासूनच दूर झाल्या.


    बालपणापासूनच ते आयुष्याच्या शेवटपर्यंत ते समाजापासून दूर राहतात. आपल्या समाजात भरपुर सांस्कृतिक कार्यक्रम होतात पण समाज त्यांना कधीच सहभागी करून घेत नाही. त्यांची इच्छा असताना देखील त्यांना समाजात घेता येत नाही. आपला समाज तृतीयपंथी व्यक्तींना एक वेगळाच समाज असल्याची नेहमी जाणीव करून देत असतो. त्यामुळे ह्या व्यक्ती समाजापासून दूर राहतात. मानसिक त्रास सहन करतात.

Article Details